Shrinivas Pawar on Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Pawar: शरयू मोटर्स तपासणीनंतर श्रीनिवास पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'अजित पवार अस्वस्थ झालेत'

Shrinivas Pawar On Ajit Pawar: 'अजित पवार हे अस्वस्थ झाले आहेत. अजित पवारांची भीती वाढली आहे त्यांना विश्वास राहिला नाही.', असे म्हणत श्रीनिवास पवार यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला.

Priya More

सागर आव्हाड, बारामती

बारामतीमधील श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री तपासणी केली. शरयू मोटर्ससंदर्भात तक्रार आली होती. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली पण त्यांना याठिकाणी काहीच सापडले नाही. शरयू मोटर्सची तपासणी करण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये चर्चा रंगल्या आहेत. शरयू मोटर्सचे मालक श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवार यांचे वडील आहेत.

बारामती मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार हे अजित पवारांविरोधात उभे राहिले आहेत. शरयू मोटर्सची तपासणी केल्याप्रकरणावर आता श्रीनिवास पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार हे अस्वस्थ झाले आहेत. अजित पवारांची भीती वाढली आहे त्यांना विश्वास राहिला नाही.', असे म्हणत त्यांनी थेट अजित पवारांवर टीका केली.

श्रीनिवास पवार यांनी सांगितले की, 'बारामतीमधील शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आले. त्याचा काय उद्देश होता. त्यातून पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. पण काल रात्री पोलिसांनी शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपेरशन राबवले आहे. त्याला निवडणुकीची किनार असल्याची माहिती समोर येत आहे.'

श्रीनिवास पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्याचे सांगितले. ते म्हणाले की,'बारामती मतदारसंघ सेंसिटिव्ह आहे. सगळीकडे कॅमेरे बसवा अशी आम्ही लेखी तक्रार दिली आहे. बूथवर गडबड होऊ शकते. श्रीनिवास पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला संरक्षण पाहिजे. मतदानानंतर किंवा मतदानाच्या दिवशी काही पण घडू शकतं. हा मतदारसंघ सेंसिटिव्ह आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण द्यावे आणि संरक्षण वाढावं.'

आईच्या पत्राबद्दल बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, 'बारामतीकर पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत. वस्ताद जागेवरती आहे पैलवानांनी तालीम बदलली आहे. त्यामुळे वस्ताद मानणारा पैलवान नवीन आहे. डिस्प्रेशन आहे त्यामुळे काही होऊ शकते. याच्याआधी आईने कधीच पत्र लिहिलं नाही. ते पत्र त्यांच्या कार्यकर्त्याने वाचून दाखवलं. हे पत्र राजकीय पण असेल. मोबाईलमुळे पत्र लिहिणे हा प्रकार कधीच बंद झालाय.'

बारामतीमध्ये फिरणाऱ्या गुलाबी रिक्षाबद्दल श्रीनिवास पवार म्हणाले की, 'आमच्या रिक्षा थांबून ठेवायचे. पिंक रिक्षा संपूर्ण बारामती शहरात फिरायच्या. त्याच्यावर कारवाई झाली नाही. अजित पवार आणि युगेंद्र पवार दोन्ही आईला सारखे आहेत हे ती बोलली आहे. आई खोटं बोलू शकत नाही. आई सभेला उपस्थित होती. आईची मजबुरी आहे म्हणून तिला वाटलं असेल ती सभेला आली. एका कुटुंबावर कुठलं गाव अवलंबुन नसतं. कुटुंबात काय चाललंय म्हणून कुठलं गाव थांबत.साहेबांनी बारामतीसाठी काय केले संपूर्ण देशाला माहिती आहे.'

अजित पवारांवर टीका करताना श्रीनिवास पवार म्हणाले की, 'पवारसाहेबांचं वय झाल्यामुळे काही लोक कंट्रोल आपल्या हातात घ्यायला पाहत आहेत. सर्व यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. काही लोक हास्यास्पद विधान करत आहेत आपण सावध राहायला पाहिजे. कधीही आपल्यावर काही करतील ते. यापूर्वी जे उमेदवार होते ते बाहेरून आलेले असायचे. पहिल्यांदाच त्यांना तोडीस तोड उमेदवार मिळाल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.'

तसंच, 'अजित पवारांची भीती वाढली आहे त्यांना विश्वास राहिला नाही. ज्या वस्तादाने आपल्याला डाव शिकवला आहे तोच डाव समोरच्या पैलवानाला शिकवतील. आखाडा बदलला आहे ते दुसऱ्या आखाड्यात जॉईन झाले आहेत. वस्ताद तिथेच आहे काही पैलवान सोडून गेले आहेत आणि दुसऱ्या आखाड्यातून आव्हान देत आहेत.', असे देखील श्रीनिवास पवारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT