Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

१, २ कोटी काय लागतील ते जाऊ दे...; शिंदेंच्या आमदाराने मतदानाच्या दिवशी पैसे वाटले? ऑडिओ क्लिप व्हायरल

Tanaji Sawant Audio Clip Viral: शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना पैसे वाटपासंदर्भात त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Priya More

Summary -

  • शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

  • मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाचा आरोप

  • “कोटी-दोन कोटी काय लागतील ते जाऊ दे” असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे

  • ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली

बालाजी सुरवसे, धाराशिव

शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तावाजी सावंत यांची पैसे वाटपाबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कोटी दोन कोटी काय लागतील ते जाऊ दे, असे तानाजी सावंतांचे ऑडिओ क्लिपमधील संवाद आहेत. तानाजी सावंत यांच्या ऑडिओ क्लिपमधील संवादामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पैशाबाबतचं बोलणं व्हाट्सअपवर सांगा, अशा सूचना या ऑडिओ क्लिपमध्ये तानाजी सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिल्या. पैशावरचे किती मतदार घेता येतात. आपल्याला ती यादी व्हॉट्सअपला टाका. आपल्याला धाराशिव जिल्ह्यातील शिरसाव, हिंगणगाव, जवळा, वाकडी या चार गावात आपल्या मागे पडायचे नाही, असे ते या व्हॉट्सअप ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात.

या व्हॉट्सअप ऑडिओ क्लिपमध्ये तानाजी सावंत असे देखील बोलताना दिसत आहेत की, 'नुसत गोड गोड बोलून नाही काम दाखवायचं आपलं! मुस्लिम -दलित वस्तीतल्या याद्या तयार करून काम सुरू करा , दोन घेऊ, तीन घेऊ कोणी चार घेऊ. शिरसाव, हिंगणगाव, जवळा, वाकडी या चार गावात आपल्याला मागे पडायचं नाही. ५० लाख जावो, कोटीभर जावो, दोन कोटी जाऊ. जे जावो ते जावो. तिथं कॉम्प्रमाईज करायचं नाही, कोणाचा विचार करायचा नाही.'

तसंच, 'याद्या तयार करायच्या आणि काम सुरू करायचं, सेन्सिटिव्ह मतदारसंघ प्रचंड झाला आहे. तुला जे वाटतंय ते मला व्हाट्सअप करायचे कोणाला बोलायचं नाही. एक शब्द आणि सुरू करायचं. तू कोणाला चर्चा करायची नाही, सभा मोठी झाली म्हणून गाफील रहायचं नाही. काय लागेल ते मला सांगायचं मी तुमच्या बरोबरच आहे.', असे देखील तानाजी सावंत हे ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

चीननं अमेरिकेची नाकेबंदी झुगारली, चीननं हाणून पाडले ट्रम्पचे मनसुबे

SCROLL FOR NEXT