Uddhav Thackeray Criticizes BJP Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech: अबकी बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंचा नारा; म्हणाले, 'येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत...'

Uddhav Thackeray Criticizes BJP: येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणा आणि भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे

Satish Daud

Uddhav Thackeray Criticizes BJP: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज कोकणातील महाड इथं पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणा आणि भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

महाडच्या सभेतून उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? जर काँग्रेस बोलली असेल की, आम्ही बजरंग दलावरती बंदी आणू, म्हणून तुम्हाला बजरंग बली आठवत असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला निघाला आहात, तुमचं काय करायचं ते पहिलं सांगा, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.  (Latest Marathi News)

अबकी बार भाजप तडीपार: उद्धव ठाकरेंचा नारा

शिवसेना पक्षाचं नाव तुम्ही माझ्याकडून काढून घेतलं. प्रभुरामचंद्रांचा धनुष्यबाण तुम्ही गद्दारांच्या हाती दिला, हा छत्रपतींचा अपमान नाहीये का? असा संतप्त सवालही त्यांनी भाजपला विचारला. जर भाजप लोकांना आवाहन करत असेल की, तुम्ही बजरंग बली की जय म्हणा, असं म्हणत लोकांना मतदान करायला लावत असतील, तर मी तुम्हाला सांगतो यापुढे जय भवानी जय शिवाजी म्हणून तुम्ही भाजपला तडीपार करा, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला तडीपार करा, असा नारा सुद्धा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.

भाजपने सर्वात मोठा नीच डाव खेळला'

शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी देखील मिळत नसेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना (शिंदे गटाला) दिले. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत. याचं आश्चर्य वाटत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही'

आम्ही शिवसेना सोडतोय कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व काय आहे ते तुम्ही समजून घ्या. जे मला शिवसेनाप्रमुख आणि प्रबोधनकारांनी हिंदुत्व सांगितलं आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही. अनेकदा मला साहेबांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडणारा नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु पाहिजे. भाजपकडं कुठलं हिंदुत्व आहे, गोमुत्रधारी हिंदुत्व आहे त्यांचं मी हे नवं नामकरण केलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT