Sanjay Gaikwad Controversial Statement On Rahul Gandhi Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस', शिंदेसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; VIDEO

Sanjay Gaikwad Controversial Statement On Rahul Gandhi Political Updates: राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या विधानावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १६ सप्टेंबर २०२४

Shivsena MLA Sanjay Gaikwad On Rahul Gandhi: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरुन सध्या राजकीय वातावण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी परदेशामध्ये बोलताना आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या विधानावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

"राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार," असे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन शिंदेंच्या आमदारांवर काही वचक आहे की नाही? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.

११ लाखांचे बक्षीस..

"महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागण्यांची आग लागलेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपणवण्याचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. माझं आव्हान आहे, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल," असे संजय गायकवाड म्हणालेत.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अमेरिकेमध्ये एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले होते. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, मात्र सध्या देशामध्ये तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भाजप तसेच समविचारी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात भाजपने आंदोलनेही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT