शिवसेनेचे नेते तसेच प्रतोद भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पण गोगावले यांनी अद्याप हा पदभार स्वीकारलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नियुक्ती केल्यामुळे ते पदभार स्वीकारतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आपण पदभार स्वीकारू असे त्यांनी सांगितले होते. पण अजूनही त्यांनी पदभार स्वीकारला नाही. नुकताच त्यांनी हे पद स्वाकारले नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली.
आपण एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले नसल्याचे आमदार भरत गोगावले सांगत आहेत. अशातच मंत्री आदिती तटकरे यांनी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेला सत्कार भरत गोगावले यांनी आज स्वीकार केला आहे. यावेळी बोलताना भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदामध्ये ढवळा ढवळ करू नका, असे हसत हसत खंत व्यक्त केली.
भरत गोगावले यांनी सांगितले की, 'मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिलं मी ते अजून घेतलं नाही. सर्व जण म्हणतात आता दिलंय ते घ्या असं सांगत आहेत. आदितीताईंच्या मंत्री पदात घुसवाघुसवी करू नका असं बोलताना काळजी करण्याचे कारण नाहीये.' असे अश्वासन गोगावले यांनी आदिती तटकरे यांना दिले. तसंच, 'पुन्हा निवडून येऊ तेव्हा दोघेही आम्ही मंत्री असू.' असं भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्यासमोर स्पष्ट केलं.
दरम्यान, भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, 'मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हे पद दिले त्याला खूपच उशीर झाला आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आचारसंहितेला १५ ते २० दिवसांचा कालावधी बाकी आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू. या चर्चेनंतरच पदभार स्वीकारायचा की नाही हे ठरवू.',
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.