Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कोकणात ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिंदे गटात मोठ्या नेत्यांची एन्ट्री होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Maharashtra Political News : राजन साळवी यांनी ठाकरेंचे शिवबंधन सोडून शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. साळवी यांच्यानंतर आता ठाकरे गटातले मोठे नेते शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्याने केले आहे.

Yash Shirke

सध्या राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा आहे. या ऑपरेशनमुळे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. भविष्यात लवकरच मोठ्या नेत्यांचे पक्षांतर होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

वैभव नाईक हे एसीबीच्या चौकशी प्रकरणामुळे अडचणीत आले आहे. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती. त्याच वेळी शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी वैभव नाईक लवकरच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. भरत गोगावले यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

राजन साळवी एसीबीच्या चौकशीमुळे वैतागले होते. या चौकशीदरम्यान त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला. साळवींप्रमाणे, वैभव नाईक यांच्यामागेही एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांनी देखील ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. या परिस्थितीवर गोगावले यांनी वैभव नाईक आपल्या गटात येणार असल्याचे म्हटले आहे.

'बैठका अगोदर घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती. अनेक लोक अजूनही आमच्याकडे येण्यासाठी लाईनमध्ये आहेत. येत्या काही दिवसात कोकणातील अनेक लोक आमच्याकडे येतील. वैभव नाईक यांच्याशी चर्चा सुरु आहेत. सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगता येत नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. एसीबी चौकशी सुरु आहे म्हणजे वैभव नाईक आरोपी झाले असे नाही', असे वक्तव्य भरत गोगावले यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

SCROLL FOR NEXT