Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : सोलापूरातील शिंदे गटातील नेते शिवाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Yash Shirke

  • सोलापूरातील शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला होता.

  • शिवाजी सावंत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • सावंत यांच्या नाराजीमुळे शिंदे गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Maharashtra : शिवसेना शिंदे गटाचे सोलापूरचे माजी जिल्हासंपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय केला. पक्षात ते नाराज होते आणि या नाराजीमुळेच त्यांनी पदाचा राजीनामा दिला अशा चर्चा सुरु आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का बसला होता.

शिवसेनेमधून बाहेर पडलेले शिवाजी सावंत हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शिवाजी सावंत यांची बंद दरवाज्याच्या आड चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. चर्चेनंतर सावंत यांनी शिवसेनेत नाराज असल्याचे जाहीरपणे सांगत भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटातील अकराहून अधिक पदाधिकाऱ्यांनीसह कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजीनामे देणाऱ्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक अशा वेगवेगळ्या तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे सावंत यांच्या जाण्याने शिवसेनेला खिंडार पडल्याचे म्हटले गेले.

'एकनिष्ठपणे शिवसेना पक्षाचे काम करत आलो आहे. पक्षात नव्याने आलेल्यांनी एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण सुरु केले. माझी परवानगी न घेता माढा तालुक्याचा प्रमुख नेमला. पक्षाकडे तक्रार करुनही काही फायदा झाला नाही. १५ दिवस झाले राजीनामा देऊन पण साधी विचारणा झाली नाही. स्वाभिमान गहाण ठेवून राहण्यात काही अर्थ नाही', असे वक्तव्य शिवाजी सावंत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT