Sharad Pawar, Uddhav Thackeray And Sanjay Shirsat Maharashtra Politics News  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: NCP फुटली असती म्हणून शरद पवारांची उद्धव ठाकरेंना गुगली; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

डॉ. माधव सावरगावे

Eknath Shinde Group Leader Sanjay Shirsat Claim : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकलेल्या 'गुगली'वर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असती म्हणून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना गुगली टाकली आणि शिवसेनेच्या चिंध्या झाल्या, असे शिरसाट म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, २०१९ मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, तीन-चार दिवसांनंतरच शरद पवार यांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यावर ही गुगली होती आणि त्यावर ते क्लीन बोल्ड झाले, असं शरद पवार (Sharad Pawar News) यांनी सांगितलं. या कलगीतुऱ्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)

फडणवीस आणि पवार यांच्यात जो कलगीतुरा झाला, त्यात आम्ही खरं होतो हे सिद्ध झालं. राष्ट्रवादी दगा देणारे आहेत हे आम्ही म्हटलं होतं आणि तेच त्या कलगीतुऱ्यातून पुढं आलं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असती म्हणून शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना गुगली टाकली आणि यातून शिवसेनेच्या चिंध्या झाला. उद्धव ठाकरे आज 'ना घर का ना घाट का' झाले आहेत. महाविकास आघाडी आता एकत्र येणे शक्य नाही. याचीच प्रचिती या सगळ्यातून आता येत आहे, असे शिरसाट म्हणाले.

एका वर्षात लोकांनी मुख्यमंत्री पाहिला, अडीच वर्षांत दिसले नव्हते

शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. अनेक आठवणी आज ताज्या झाल्या आहेत. आरोप, टीका, सगळं होत एक वर्ष झालं. आमचे मृतदेह येतील, पोस्टमार्टेम करू इथपर्यंत बोलले, मात्र या एका वर्षात लोकांनी मुख्यमंत्री पहिला. त्याआधी अडीच वर्षे ते दिसले नव्हते, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

सरकार तीन महिन्यांत, दोन महिन्यांत जाईल, असे म्हणत होते, पण बघा एक वर्ष झाला आणि आता हे सरकार कालावधी सुद्धा पूर्ण करेल. फसवणुकीचं एक वर्ष म्हणणाऱ्यांनो, तुम्ही घरात होता. आज ही बोध घ्या. राष्ट्रवादीने तुम्हाला फसवलं आहे, असेही शिरसाट यांनी सांगितले.

८ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार, चिंता नको

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून (Maharashtra Cabinet Expansion) विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यावर शिरसाट यांनी भाष्य केले. येत्या आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल. चिंता करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीला जाणे काही चूक नाही. पाहिले मातोश्रीवर नव्हते जात का? असा सवालही त्यांनी केला.

मंत्रिमंडळातून कुणालाही नारळ मिळणार नाहीत. या फक्त बातम्या आहेत. त्याला अर्थ नाही. संजय राऊत हे चार जण जाणार म्हणतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असेही शिरसाट म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. आमचे दोन जण मंत्री होतील हे राज्यसाठी चांगले संकेत आहेत, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंना टोला

समान नागरी कायदा गरजेचा आहे. अनेकांनी पाठिंबा दिलाय. मात्र काही त्याला विरोध करत आहेत. आदित्य ठाकरे मोर्चा काढतात हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. गेली २५ वर्षे यांनीच भ्रष्टाचार केला आहे. यांच्या टक्केवारीत गळती सुरू झाली आहे. म्हणून मोर्चा आहे. आदित्य पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंकडे महापालिका आहे. मुंबईचं वाटोळं का केलं असं घरी बाबांना विचारा. आदित्य असो वा कुणीही असो भ्रष्टाचार करणारा आता जेलमध्ये जाणार आहे, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT