Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: शिवसेनेला केंद्रात मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? मुख्यमंत्री शिंदे शहांच्या भेटीला दिल्लीला रवाना

शिवसेनेला केंद्रात मिळणार कॅबिनेट मंत्रिपद? मुख्यमंत्री शिंदे शहांच्या भेटीला दिल्लीला रवाना

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत. आज रात्री त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी भेट होऊ शकते. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते.

यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन किंवा तीन खासदरांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्याता आहे. एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्य मंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

शाह आणि नड्डा यांच्या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांची राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होऊ शकते. याआधी १९ जून म्हणजेच शिवसेनेचा वर्धापन दिनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती. मात्र तसं झालं नाही. (Latest Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा  मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? याबाबत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, केंद्र सरकाराच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला यंदा कोणतं खातं मिळू शकतं, यावरही अनेकांचं लक्ष लागलं आहे. यंदाही शिवसेनेला नेहमी प्रमाणे अवजड उद्योग विभागाचं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT