Sanjay Shirsat Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: महायुतीत आम्हीच मोठा भाऊ, शिरसाट यांच्या विधानाने विधानसभेआधीच पेटला वाद

Maharashtra Politics: राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागलेत. राजकीय पक्षांकडून मार्चेबांधणी केली जात असून जागांची चाचपणी केली जातेय. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष दावे करू लागलेत. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलंय. यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. जागावाटपावरून हेवेदावे सुरू झाले आहेत. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक विधान केलंय. या विधानामुळे विधानसभेच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्याआधीच वादाचं ढोल वाजू लागलेत.

आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यामुळे आम्ही मोठा भाऊ आहे, असं विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय.शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत जागावाटपावरुन वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. विधानसभेत शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जाणार आहे, यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

लोकसभेत शिवसेनेने १५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ७ जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यानुसार विधानसभेत शिवसेना अधिक जागांचा दावा करेल. शिवसेनेच्या या दाव्यामुळे विधानसभेचं बिगूल वाजण्याआधी महायुतीत वादाचे ढोल वाजू लागलेत.

ठाकरे यांनी लढविलेल्या जागा २२ आम्ही लढविलेल्या १५ आहे. यात तुलना केला तर आमचा स्ट्राईक रेट चांगला असून तो ४६ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाल्याचं संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान संजय शिरसाट यांच्या विधानाचा अर्थ आता महायुतीतील विधानसभेच्या जागावाटपावरून काढला जातोय.

विधानसभेत शिवसेनेला जास्त जागा द्याव्यात असा दावा अप्रत्यक्षपणे शिरसाट यांनी केलाय. दुसरीकडे शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा आम्हाला हव्यात अशी मागणी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीती

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Doctor Warns: शरीरात दिसणारे हे 5 सामान्य बदल असू शकतात ब्लड कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Gold Rate : प्रति तोळा ७ हजारांनी सोनं झालं स्वस्त, चार दिवसात मार्केटमध्ये घसरण, वाचा नवे दर काय?

फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

SCROLL FOR NEXT