Shivsena Shinde Group And Thackeray Group Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

Sanjay Raut and Naresh Mhaske viral video outside Supreme Court: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर आमने-सामने आले. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खडाजंगी झाली याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More
  • सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना आमने-सामने

  • शिवसेनेच्या नेत्यांचा सुप्रीम कोर्टाबाहेर ड्रामा

  • नरेश म्हस्के, संजय राऊत आणि अनिल देसाई यांचा व्हिडीओ व्हायरल

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आजही सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहेत. मंगळवारी देखील महत्वाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेमधील ड्राम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज देखील सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आपली बाजू मांडत आहेत. मंगळवारच्या सुमावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, लोकप्रतिनिधी कायदा आणि पक्षाच्या घटनेवरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली.

आजच्या सुनावणीत देखील दोन्ही शिवसेना आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. शिंदेसेनेचे नेते नरेश म्हस्के आणि ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधला.

नरेश म्हस्के आणि संजय राऊत हे दोन्ही नेते कोर्टाबाहेर एकमेकांना हसत हसत टोला लगावताना दिसले. संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर ठाकरेसेनेचे नेते अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेले. तिन्ही नेते हसताना दिसले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तिन्ही नेत्यात काय बोलणं झालं याची माहिती समोर आली नाही. पण यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT