Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बडा नेता आज 'धनुष्यबाण' घेणार हाती

Shinde Sena Set to NCP: रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला. सुनील तटकरे यांच्या बड्या नेत्याला भरत गोगावले यांनी फोडलं.

Priya More

कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या रोह्यात शिवसेना आज राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष आणि तटकरे कुटूंबाचे निवटवर्तीय प्रमोद म्हसकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थित संध्याकाळी रोहा शहरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रमोद म्हसकर यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रोहा, पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात म्हसकर यांचा संपर्क असून या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे राजकीय संकेत आहेत.

दरम्यान, रायगडमध्ये सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वाद उफाळला आहे. रायगडमधील या दोन्ही पक्षातील राजकीय वाद दिवसेंदिवस विकोपाला चालला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यासह इतर नेत्यांकडून सतत टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. नुकताच भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला होता. '२०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबाला दणका देणार', असे वक्तव्य त्यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपूरमध्ये भयंकर दुर्घटना; विहिरीचा कठडा कोसळून ४ जण ढिगाऱ्याखाली, तिघांचे मृतदेह बाहेर काढले

Maharashtra News Live Update: पुणे रेल्वे स्थानकातून १ ते १३ नोव्हेंबर पर्यंत लाखो प्रवाशांनी केला प्रवास

Accident : लग्नाहून येताना भीषण अपघात! SUV आणि पिकअपची जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर

Weather Update: देशाला चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ९ राज्यांना इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

Monday Horoscope : घरगुती खर्च वाढेल! ५ राशींना पैशाची चणचण जाणवेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT