Konkan politics heats up: Shinde Sena gains strength as Thackeray camp loses loyalists. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Konkan Politics: उदय सामंत आणि किरण सामंत यांनी शिंदे सेनेला बळकटी दिल्याने कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक निष्ठावंत समर्थक आणि स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला सोडचिठ्ठी दिलीय.

Bharat Jadhav

  • कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.

  • सामंत बंधूंनी शिंदे गटाची ताकद वाढवलीय.

  • अनेक सरपंच, शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहेत. त्यानुसार राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिंदे गट शिवसेनेने राज्यभरात आपली ताकद वाढवलीय. विशेषत: कोकणात ताकद वाढवत ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनी जबरदस्त अॅक्टिव्ह झालेत. त्यांनी तेथे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलंय.

दोन्ही भावांनी कोकणाचा मोर्चा संभाळत पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग करून घेतलीय. सामंत ॲक्शन मोडवर आलेत. काही महिने त्यांचे प्रत्येक गावात दौरेही सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेत त्यांनी नेटवर्क मजबूत करण्यास सुरुवात केलीय. मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटावर किरण सामंत जातीने लक्ष दिलंय.

सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्त साधत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतलाय. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील ठाकरे गटातील ताम्हणे सरपंच समीक्षा बावस्कर यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र सावंत, शाखाप्रमुख भाई अडसूळ यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Roads : मोठा निर्णय! रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे पडलात किंवा मृत्यू झाला तर मिळणार भरपाई, जाणून घ्या

Wardha Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पोलिसदादा; वर्ध्यातील १८०० पोलीस देणार एका दिवसाचे वेतन

'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनीचे लचके तोडले

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर

Gold Price: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळा सोनं ३२,८०० रुपयांनी वाढले; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT