SHARAD PAWAR GROUP FACES BIG SETBACK AS SOLAPUR MLA ABHIJIT PATIL SIGNALS REBELLION Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; सोलापुरातील बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार?

Solapur Politics: सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार अभिजित पाटील यांनी उमेदवार निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Bharat Jadhav

  • विधानपरिषद निवडणुकीपूर्वी शरद पवार गटासमोर नवे राजकीय आव्हान

  • माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

  • वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवरून वाद

ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या काळात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत धुसफूसीमुळे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिलेत. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. त्याच दरम्यान सोलापुरात शरद पवार गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

अभिजीत पाटील यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर आक्षेप घेत बंडखोरीचे संकेत दिलेत. पक्षाने आपल्याला विश्वासात न घेता वसंत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, असा आरोप पाटील यांनी केला. आता मला माझा पर्याय काढावा लागेल, असा थेट इशारा अभिजीत पाटील यांनी दिला आहे, यामुळे शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिलंय.

पक्षाने आणि मोहिते-पाटलांनी विचारातच घेतले नाही: आमदार पाटील

पक्षात हुकुमशाही राबवली जात असल्याचा आरोप आमदार अभिजीत पाटील यांनी केला होता, त्यावरून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. वसंत देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने आपल्याला विचारातही घेतले नाही. कोणतीही माहिती न देताच पक्षाने देशमुखांना उमेदवारी देवून टाकली. इतकेच नाही तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही आपणास बोलवले नाही. पक्ष उमेदवार देणार आहे, हेच मला माहिती नव्हते, असा गंभीर आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.

पक्षाचा उमेदवार पाडणाऱ्या मत द्यायचं?

अभिजीत पाटील यांनी उमेदवाराच्या निष्ठावंतावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पंढरपूर येथील जुन्या राजकीय घडामोडींचा दाखला देताना ते म्हणाले की, पंढरपूरच्या सभापती पदाच्या निवडीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या याच वसंत देशमुखांनी पक्षाशी गद्दारी केली होती आणि तुतारीचा अधिकृत उमेदवार पाडला होता. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला होता. ज्यांनी पक्षाचे नुकसान केले, त्यांना आता आम्ही मत का टाकायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT