Big Breaking News sharad pawar Group one mla and mp support to ajit pawar maharashtra politics SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'चिंता नको, ५ चिन्हांवर निवडणुका लढल्या आणि जिंकूनही आलो...'; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar Criticizes Bjp: गुजरात आणि 2-3 छोट्या राज्यात भाजप आहे. देशाचा मूड बदलला आहे, लोक या बदलात सहभागी होत आहेत.. असेही शरद पवार म्हणाले.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Sharad Pawar News:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. उद्या (शुक्रवार, ६ ऑक्टोंबर) ला निवडणूक आयोगाकडून याबाबतची सुनावणी होणार आहे. त्याआधी शरद पवार गटाकडून दिल्लीत महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी निर्णय आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले शरद पवार?

"माझी अध्यक्षपदाची निवड झाली होती, ती प्रोसेस मी सांगितली होती. आता हे लोक म्हणत आहेत माझी निवड चुकीची आहे. निवडणूक आयोगात अजून काहीच नाही झालं तरी हे लोक चिन्ह, पक्ष आम्हाला मिळेल अस म्हणत आहेत. कशावरुन बोलतात हे समजू शकत नाही.." असे शरद पवार (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.

निकाल आमच्याच बाजूने..

यावेळी बोलताना शरद पवार यांनी "राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असे म्हणत निवडणूक आयोगाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच निर्णय काहीही लागला तरी चिंता करु का.." असेही ते यावेळी म्हणाले.

"केरळ, हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे भाजप नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडून भाजपने सरकार बनवले आहे. असे म्हणत गुजरात आणि 2-3 छोट्या राज्यात भाजप आहे. म्हणून मी म्हणतो देशाचा मूड बदलला आहे, लोक या बदलत सहभागी होत आहेत.." असे शरद पवार यावेळी म्हणाले.

ईडी, सीबीआयचा गैरवापर...

"ईडी सीबीआय याआधीही होते. पण याचा कधीही गैरवापर झाला नव्हता. आजकाल गावात भांडणे झाली तरी ईडी लावू म्हणतात, असे म्हणतात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्री बनवले," अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच भाजपने कमळ चिन्ह बदलून वॉशिंग मशिन ठेवावं असा घणाघातही शरद पवार यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT