Sharad Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

Sharad Pawar Meeting: सोलापूरमध्ये शरद पवारांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीमध्ये सोलापूरमधील ३ आमदरांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Priya More

Summary -

  • शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली

  • सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांपैकी तीन आमदार बैठकिला उपस्थित राहिले नाहीत

  • आमदारांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • मोहोळ, करमाळा आणि माळशिरसचे आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा

भरत नागणे, पंढरपूर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांची शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे एकमेव आमदार उपस्थित होते. तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मात्र बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले.

एकीकडे अजित पवार गटाचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाच्या तीन आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. या बैठकीला पक्षाच्या ४ पैकी ३ आमदारांनी दांडी मारल्याने या आमदारांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली आहे.

मोहोळच्या आमदार राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आले असले तरी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते होते ते देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे ऐनवेळी बैठकीला का अनुपस्थित राहिले याची मात्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

SCROLL FOR NEXT