मयुर राणे, मुंबई|ता. १८ फेब्रुवारी २०२४
नुकताच शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडले. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत युती तोडल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती आहे त्यांना काहीही बोलण्याचं लायसन्स दिले गेलेले नाही या महाराष्ट्रात. महाशय बोलत असताना अधिवेशातून लोकं उठून जात होते त्याचे व्हिडिओ आले आहेत. महाशय असे म्हणत आहे की अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दारा आड चर्चा झाली नाही किती खोटे बोलत आहे हा माणूस?"
अमित शहा का आले..?
"मिस्टर अमित शहा (Amit Shah) मातोश्रीमध्ये कशाला आले होते ? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न स्वतः महाशय यांनी स्वतःला विचारावा, त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का मी होतो? बंद दाराआड चर्चे वेळी मी होतो ते न्हवते," असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत तुमच्यासारखे पळपुटे नाही, पळून जाणारे नाही आम्ही डरपोक नाही. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही, अशी टीका करत महाराष्ट्र यांना धडा शिकवेल," असा थेट इशाराही संजय राऊत यांनी दिला.
"काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशना मध्ये भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये? काय ही लाचारी बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता. यांच्यात कमरेत जोर आहे. दिल्लीत मध्ये जाऊन वाकत आहे. निवडणुकीमध्ये कळेल यांना हिम्मत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या मग जोर काय आहे ते काढू," असे आव्हानही राऊतांनी दिले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.