Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी'; विधानभवनाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी

Sanjay Raut on Jitendra Awhad: विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्य सरकारवर हल्ला चढवत या घटनेची तुलना 'गँगवॉर' शी केली आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

विधानभवनाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त धक्काबुक्की झाली. गावगुंडांप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तिखट हल्ला चढवला आहे. त्यांनी विधानभवनातील घटनेला 'गँगवॉर' संबोधत थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

'विधानभवनामध्ये काल टोळीयुद्ध पाहायला मिळालं. हत्या, मकोका अन् दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये राडा घालत होते. त्यांना नेमकं कुणी आणलं, त्यांच्यावर काय कारवाई झाली?', असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. 'कालची घटना घडल्यानंतर शिवसेनेचं स्पष्ट मत झालं आहे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच लागायला हवी. याचं कारण म्हणजे राज्य नियंत्रणामध्ये राहिल', असंही राऊत म्हणाले.

'हे खरंतर गुडांचं राज्य झालं आहे. जर हे इतर राज्यात झालं असतं तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा. इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग त्यांना काल असा प्रश्न पडला नाही का? त्यांनी जर आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की राज्यात आता राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे', असं राऊत म्हणाले.

'भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते. त्यांचा रेकॉर्ड एकदा तपासा. त्यातील किती मकोकाचे आरोपी आहेत. मकोका, दाऊद इब्राहिमचे हस्तक, विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागले आहेत. उद्या ते विधानसभेत जातील सभागृहात येतील. भाजपकडून उत्तेजन देण्यात येईल', असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; आणखी ४४६ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Abir Gulaal Release: दिलजीत दोसांझचे नियम फॉलो करतोय फवाद खान; अबीर गुलाल 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेस नेत्याची मोठी मागणी, पत्रात काय म्हटलंय?

कृष्ण जन्माष्टमीला घरात कोणत्या ठिकाणी मोरपिस ठेवणं शुभ?

Nurse: नर्सला 'सिस्टर' का म्हणतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

SCROLL FOR NEXT