Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रीमंडळावरुन संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...
Sanjay Raut vs Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रिमंडळावरून संजय राऊतांनी CM शिंदे, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...

Gangappa Pujari

मयुर राणे| मुंबई, ता. १० जून २०२४

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या एनडीए सरकारचा काल शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नव्या एनडीए सरकारमध्ये राज्यातील ६ खासदारांची वर्णी लागली असून अजित पवार गटाला मात्र मंत्रीपद मिळाले नाही. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे अन् अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"हे एनडीएचे सरकार आहे, मोदींचे नाही. अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्षाकडे आश्रयाला आहेत. त्यांना स्वाभिमान असता तर राज्यमंत्रीपद धुडकावले असते. हे कॅबिनेट मंत्रीपदही किती दिवस टिकेल माहित नाही. काल ते शपथ घेत असताना काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला होत होता. तुम्हाला काश्मिर, जम्मू काश्मिरची चिंता नाही. फक्त सरकार चालवायचे आहे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

"हे मोदी सरकार किंवा भाजपचे सरकार नाही. आत्तापर्यंत, मोदी सरकार, अबकी बार, मोदी है तो मुमकीन है,सबकुछ मोदी, काल ते चित्र नव्हते. दोन बाबू महत्वाचे आहेत. या टेकुंचा इतिहास सर्वांना माहित आहे. पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल शेअर मार्केट वाल्यांचे मंत्री आहेत, अजित दादांच्या वाट्याला भोपळाच आहे, अन् नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकले," अशी टीकाही राऊतांनी केली.

"प्रफुल पटेलांची १५० कोटींची प्रॉपर्टी ईडीने परत केली. केस परत घेतली, मगं मंत्रीपद कशाला पाहिजे. काल शपथविधी घेत असताना काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, १० जणांचा बळी गेला. त्यावर पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी काहीच बोलले नाहीत. शपथ घेतली पण लोकांमध्ये उत्साह नाही. भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला. हे ओढून ताणून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

SCROLL FOR NEXT