Sanjay Raut Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मुख्यमंत्र्यांकडे कोट्यावधी रुपये; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी करावी.. संजय राऊतांचा CM शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut News: मुख्यमंत्री कार्यालयातून या गुंडांवर मॉनिटर होतं. त्यासाठी पोलीस काम करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आहेत का?" असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Sanjay Raut Press Conference:

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"सध्या या देशात PMLA कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात टाकत आहेत त्यासाठी त्याचा वापर करत आहेत. हेमंत सोरेन यांना त्याच कायद्यानुसार तुरुंगात टाकले आहे. केजरीवाल यांना त्याच कायद्याने अटक करण्याचा घाट आहे. राज्यात मी, अनिल देशमुख, नवाब मलिक यांना अटक केली. गुन्हेगारी स्वरूपात कोणी पैसे घेतले तर त्यांना अटक झाली पाहिजे. गणपत गायकवाड यांचे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) आहेत. त्याचा ईडीने शोध घ्यावा..." अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

श्रीकांत शिंदे, पार्थ पवारांवर निशाणा...

"एका उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव गुंडाच्या घरी पुण्यात गेले आणि विचार आदान प्रदान केले. कालचा एकाचा फोटो आम्ही जाहीर केला बाकी लवकरच करु. ते कोण आहेत याची माहिती पुणे पोलिसांनी द्यावी. मुख्यमंत्री कार्यालयातून या गुंडांवर मॉनिटर होतं. त्यासाठी पोलीस काम करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आहेत का?" असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

शिंदे गटाला इशारा...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. "माझ्याकडे शिंदे गटाच्या खासदारांचा परदेशात जातानाचा एक व्हिडिओ आला आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे चरित्र लवकरच समोर येईल. वेट एन्ड वॉच, सगळं बाहेर येईल," असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रेन ऑपरेटरवर लोखंडी रॉडने हल्ला, रे रोडमधील धक्कादायक घटना

टीम इंडियासाठी गुड न्यूज; तगडा खेळाडू पुन्हा संघात परतणार

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियात होणार धक्कादायक उलटफेर, मॅचविनर खेळाडूची विकेट पडणार

लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

अंबानींना मोठा दणका! मुंबईतील 3 हजार कोटीच्या घरावर ईडीची जप्ती; देशात खळबळ

SCROLL FOR NEXT