गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे', असे वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्धव यांनीही जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या मनात आहे ते होईल असं म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
मात्र त्यानंतर युतीचा कॉल 'पहेले आप पहले आप'च्या हट्टामध्ये रखडलाय. त्यात आता मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊतांच्या एकमेकांवरील तिखट शाब्दिक माऱ्यानं युतीची शक्यता धुसर होत चालली आहे. देशपांडे राजकारणात नवीन आहेत, असा टोला राऊतांनी लगावला होता. त्याला देशपांडेंनी खरमरीत प्रत्युत्तर दिलंय.
होय आम्ही नवीन आहोत. पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. खरतर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह ठाणे, नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन सुरु झाले होते.
मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली आणि दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली. त्यानंतरच देशपांडे सातत्याने ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करत आहेत. युतीबाबत याआधी उत्साह का नाही दाखवला असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना टोला लगावत युतीबाबत आशावाद व्यक्त केलाय.
विधानसभा निवडणुकीत केवळ 20 आमदार निवडून आलेल्या ठाकरे सेनेसाठी आगामी मनपा निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई महापालिका हातातून जाऊ नये आणि ठाकरे ब्रँण्ड जिवंत राहावा यासाठी उद्धव सेनेचा आटापीटा सुरु आहे. मात्र संदीप देशपांडेची वक्तव्य पाहता राज ठाकरे हे उद्धव यांना टाळी देण्याचं टाळतायेत, असंच सध्यातरी चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.