Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेला संभाजीराजे-जरांगे एकत्र? विधानसभेला नवी समीकरणं जुळणार?

Maharashtra Politics: महायुती आणि महाविकास आघाडीला समर्थ पर्याय देण्यासाठी संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाने जरांगेंसोबतच्या आघाडीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येणार का? राज्यात नवं समीकरण जुळणार का? याविषयीचा स्पेशल रिपोर्

Bharat Jadhav

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. महायुती आणि मविआनं जोरदार तयारी सुरू केलेली असताना तिस-या आघाडीचीही जुळवाजुळव सुरू आहे. मात्र या सा-या राजकीय घडामोडी सुरू असताना आता आणखी एक नवी मोट बांधण्याच्या हालचाली छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षानं सुरू केल्या आहेत. संभाजीराजे थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्धार करणा-या मनोज जरांगेंसोबतच आघाडीची मोट बाधण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात संभाजीराजे जरांगेंशी चर्चा करणार असल्यामुळे नव्या आघाडीचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मराठा आरक्षणासाठी जरांगेंची लढाई राजकीय वळणावर पोहचली आहे. जरांगेंनी थेट विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. त्यासाठी त्यांनी इच्छूकांच्या मुलाखती घेण्याची तयारी सुरू केलीय. मात्र जरांगे बिनबुडाचा लोटा असून विधानसभेला एकही जागा लढवणार नसल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय.

राज्यात प्रस्थापित महायुती आणि मविआला शह देण्यासाठी बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, रविकांत तुपकरांसह ओबीसी संघटनांनी विधानसभेची चाचपणी सुरू केलीय. त्यात आता संभाजीराजेंनी जरांगेंशी आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजे आणि जरांगे तिस-या आघाडीसोबत जाणार की स्वत:ची वेगळी मोट बांधणार याबाबत तर उत्सुकता आहेत. मात्र स्वबळावर सर्व विधानसभेच्या जागा लढवण्याची भीमगर्जना करणारे जरांगे राजेंना कसा प्रतिसाद देतात यावर सारी समीकरणं अवलंबून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT