Rupali Thombre Patil meeting MP Dr. Shrikant Shinde in Mumbai, sparking intense political speculation. Saam Tv
महाराष्ट्र

आधी मनसे, नंतर राष्ट्रवादी आणि आता शिवसेना? रूपाली ठोंबरेंच्या शिंदे भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

Rupali Thombre Patil Meeting With Shrikant Shinde: रूपाली ठोंबरे पाटील यांनी मुंबईत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मनसे ते राष्ट्रवादी आणि आता शिवसेना प्रवेशाच्या शक्यतांवरून नवी चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. काही दिवसंपूर्वीच रूपाली पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत मोठे आंदोलन केले होते. तसेच चाकणकरांवर हल्लाबोल केला होता. यावरूनच पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटिस ही बजावल्याचा फोटोही व्हायरल झाला होता.

त्यानंतर रूपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र दोघांची भेट झाल्यानंतर दोन दिवसात त्यांना पक्षाच्या प्रवक्तापदावरून काढले गेले. त्यानंतर त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सगळ्या नाराजी नात्यानंतर रूपाली पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये भेट घेतली आहे. विशेष म्हणजे रूपाली पाटील यांच्यासोबत कॉँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले यादेखील उपस्थित होत्या.

सुरुवातीला रूपाली पाटील मनसे पक्षामध्ये होत्या. राज ठाकरे यांच्या कट्टर कार्यकर्त्या मानल्या जात असे. मात्र पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्यांनी मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्षात ही त्यांचे अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे रूपाली ठोंबरे पाटील लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रूपाली ठोंबरे पाटील लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रूपाली ठोंबरे पाटील यांचे भेटीनंतर स्पष्टीकरण

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माझी भेट ही पूर्णपणे कामानिमित्त झाली होती. मला शिवसेना शिंदे गट किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून सध्या कोणतीही ऑफर आलेली नाही. मात्र काम करणाऱ्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला जर कधी ऑफर मिळाली, तर त्यावर विचार करण्यास हरकत नाही. ही भेट ही फक्त महा‌यूतीतील मित्रपक्षाचे खासदार म्हणून झाली होती. म्हणून, डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली यामागे दुसरा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. असे रूपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT