राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलंय. भाजप खासदार कंगना रणौत यांच्या घरी आयोजित ‘राष्ट्र सेविका समिती’च्या महिला शाखेच्या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार यांना टोला लगावताना त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलंय. पुतण्याच्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सणसणीत उत्तर दिलंय.
भाजपच्या लोकसभा खासदार कंगना राणौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. याबाबतचे फोटो राणौत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेत. या फोटोमध्ये भारतमातेच्या फोटो आहे. आरएसएसचे संपादक केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचेही फोटो कार्यक्रमात दिसत आहेत.
यावरून रोहित पवारांनी आपल्या काकांना टार्गेट केलं. अजित पवार एकीकडे शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत असतात. दुसरीकडे त्यांचा प्रतिनिधी आरएसएसच्या बैठकीला जातो. हे दुटप्पी राजकारण असल्याची टीका रोहित पवारांनी केली. यावरून अजित पवारांनी देखील मिश्किल टोलेबाजी केल्याच पाहायला मिळालं.
अजित पवार यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, , "मला वाटतं की, अजित पवार सत्तेत गेलेत, त्याची वेगळी कारणं आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचे विचार स्विकारले नसतील. त्यामुळेच त्यांच्यावर कुठेतरी दबाव असेल. एखाद्या बैठकीला या. एखादा फोटो येऊ द्या. यामुळे कुठेतरी संदेश जातो, हे सुद्धा आरएसएसचा विचार आता स्विकारायला लागले आहेत.
दरम्यान वर्धा येथील पत्रकार परिषदेत अजित पवारांना या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर अजित पवारांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे म्हटलंय. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी विचारतो. मला माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनीट-मिनीट मला माहिती नसतं. मी आता विचारतो, का गं कुठं गेली होती?” असं खोचक उत्तर त्यांनी दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.