Chhatrapati Sambhajinagar Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटात मोठी बंडखोरी; उपमहापौर पदासाठी नेत्यांनी डावलला पक्षाचा आदेश

Chhatrapati Sambhajinagar Politics: महापौरपदाच्या निवडीसाठी घडामोडींना वेग आला असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. पक्षात बंडखोरी होणार असल्याची चिन्हे आहेत.

Bharat Jadhav

  • उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

  • महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर

महापालिका निवडणुकीनंतर आता महापौरपदाच्या निवडीसाठी राज्यात घडामोडींना वेग आलाय. मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का देणाऱ्या शिंदे सेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसलाय. येथे पक्षात बंडखोरी पहायला मिळत आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश आलं.

भाजप हा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांप्रमाणेच महापालिकेतही राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये. अनेक ठिकाणी भाजपला शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपकडे महापौरपद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

यासर्व पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी हाती आलीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर एमआएएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप वेगवेगळे निवडणूक लढलेत. पण तरी देखील शिवसेना शिंदे गटानं भाजपला पाठिंबा दिलाय.

त्यामुळे, आता या महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असेन. त्याचदरम्यान येथे शिंदे गटात फुट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट हे उपमहापौर पदासाठी पक्ष आदेश डावलून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

तसेच जिल्हा परिषद मतदान पार पडल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्र जंजाळ हे देखील उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे १० तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीच्या दिवशी काय राजकीय स्थिती निर्माण होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar Tourism : नारळाची झाडं, खळखळणाऱ्या लाटा; विरारमध्ये लपलंय निसर्गरत्न, 'हे' आहे वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update: गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGCनं रचला होता कट

Long Hair Tips: केस होतील कंबरेपर्यंत लांब, आजच ट्राय करा 'या' ५ सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT