Raj-Uddhav Thackeray Alliance  Saam Tv News
महाराष्ट्र

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Raj-Uddhav Thackeray Melava Teaser: ठाकरे बंधूंच्या शक्तीप्रदर्शनाच्या नव्या टीजरची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यामुळे दोन वाघांची ही गोष्ट नेमकी आहे तरी काय? हे वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

ही दुष्य डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफीचॅनलची जरी असली तरी ती सध्या महाराष्ट्रातील राजकारणाशी साधर्म्य साधणारी आहेत. होय ठाकरे बंधुच्या युतीची ही कहाणी सांगणारी ही दृष्य. एकीचं बळ या दृष्यातून पहायला मिळालं. अगदी तसंच दुरावलेले दोन भाऊ एकत्र आले तर भविष्यात किती बलवान होतील याचं चित्र मांडणारा हा व्हिडीओ मनसेच्या सचिन मोरेंनी ट्विट केलाय.

2005 ला ठाकरे घराण्यात उभी फूट पडली. राज ठाकरेंनी नवीन पक्ष काढला, वाढवला, सुरवातीला निवडणूका जिंकल्या पण यशात सातत्य काही राहिलं नाही. अगदी तसंच उद्धव ठाकरेंसोबतही घडलं.. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिका राखल्या, युती आघाडी करत सत्ता मिळवली. पण नुकत्याच झालेल्या निवडणूकांनी दोन्ही ठाकरें बंधूनां अक्षरश पराभवाच्या खाईत लोटलं.

इतकं की ठाकरे ब्रँड राहिल की संपेल, अशीच भिती त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली. त्याच पडझडीनंतर नवी पालवी फुटावी अशी मराठीसाठी या दोन्ही भावांची एकी युतीकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसू लागल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली तर विरोधकांनी मात्र याच युतीची खिल्ली उडवली.

आता ठाकरेंनी एकीचं बळ दाखवायला सुरुवात केलीय... हेच दोन भाऊ एकत्र आल्यास त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.

मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद

शहरी भागांमधील ठाकरे गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा

मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त

उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषणशैलीचा फायदा होण्याची शक्यता.

गेले 19 वर्ष उद्धव आणि राज ठाकरेंमधील विस्तव जाता जात नव्हता. दोनवेळा युतीच्या फसलेल्या प्रयोगानं मराठी माणसाची एकीची आशा दुरावली होती मात्र आता दोन भाऊ मराठीसाठी एकत्र येतायेत. त्यामुळे तुकोबांच्या भाषेत सांगायचं तर एकीचे बळ पांढरे | तेथे चोहीकडे जयघोष रे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT