महाराष्ट्र

Raj Thackeray Meets Eknath Shinde: २० मिनिटांच्या भेटीत ठरली मोठी राजकीय डील? एकनाथ शिंदेंच्या भेटीमागील 'राज'कारण आलं समोर

Raj Thackeray Meets Eknath Shinde: ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असती. दोन्ही नेत्यांमध्ये २०-२५ मिनिटे चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Bharat Jadhav

  • राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट

  • सुमारे 20–25 मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा

  • महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणारे दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला होता. आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय राजकीय चर्चा झाली याचा तपशील समोर आलाय.

महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट आणि राज ठाकरे यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले होते. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल चढवला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती झाल्याने शिंदे गट आणि मनसेमधील संबंध दुरावतील असं वाटत होतं. परंतु आज अचानक राज ठाकरे यांनी ठाण्यातील नंदनवण बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यामध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. मात्र भाजप-शिवसेनेविरुद्ध लढणाऱ्या मनसेनं महापौर निवडीवेळी शिंदेंच्या शिवसेनेसा पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना मनसेनं थेट शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

या भेटीत एकनाथ शिंदेंनी मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल, असे आश्वासन दिलं आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. आजच्या एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतरही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली. त्यावर एवढं मोठं काही राजकारण किंवा चर्चा करायची गरज नाहीये. एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते जरी असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटायला जावं, जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT