Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : रायगडच्या माणगावमध्ये शिंदे गटाचा महाविजय निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीला माजी नगराध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Yash Shirke

Maharashtra : रायगडमधील माणगाव येथे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळ्याव्यात माणगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. ज्ञानेश्वर पवार हे राष्ट्रवादीत होता. पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षातील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आजच्या (१३ ऑगस्ट) मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या मेळाव्यात भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली.

...तर सुनील तटकरे यांचा जय महाराष्ट्र झाला असता!

'आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले. ते विसरले असतील. परंतु आता त्यांची उल्टी गिनती सुरू झाली आहे', अशा शब्दात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. शिवसेना भाजपच्या ४ आमदारांनी जर मदत केली नसती, आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती, तरी त्यांचा (सुनील तटकरे) जय महाराष्ट्र झाला असता असेही भरत गोगावले म्हणाले.

आमदार महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल

माणगाव येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा आहे. 'सुनील तटकरे यांनी रायगडला लुटले, ओरबाडून खाल्ले. सरकारी जमिनी सुद्धा लुटल्या' असा आरोप थोरवे यांनी केला. 'तुमच्या जमिनीचा सातबारा एकदा चेक करून बघा नाहीतर तो देखील ट्रान्फर झालेला असेल', असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. आमच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सेवा असून सेवा करण्यासाठीच आम्हाला पालकमंत्री पद हवे असल्याचे महेंद्र थोरवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? वाचा सविस्तर माहिती

Side Effects Of Onion: रात्री कांदा का खाऊ नये? कारण जाणून घ्या

Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

SCROLL FOR NEXT