Raigad Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचा वाद चिघळला, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिंदेसेनेच्या शिलेदारांची मुघलांच्या वंशजांशी तुलना

Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या वाद सुरु आहे. हा वाद पुन्हा एकदा भडकला आहे. गोगावलेंच्या समर्थकांनी तटकरेंवर टीका केली. त्यानंतर तटकरे समर्थकांनी शिंदेंच्या शिलेदारांना मुघलांचे वंशज म्हटले.

Yash Shirke

भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थोरवे, दळवींसह भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला. शिंदेंच्या शिलेदारांची तुलना परांजपे यांनी मुघलांशी केली.

'काल पुन्हा एकदा रायगडमध्ये कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली. खासदार सुनील तटकरे २०२९ ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्त्व करुन लोकसभेला विजयी होतीलच, पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला, त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागेल अशी वेळ रायगडची जनता तुमच्यावर आणेल', असे वक्तव्य आनंद परांजपे यांनी केले.

'सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टिका करणारे शिवसेनेचे मंत्री, दोन्ही आमदार हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे आक्रमण करत असतात. महेंद्र थोरवेचं तर मला खास करुन आश्चर्य वाटत, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की २०१९ मध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. तुमचे डान्स बारचे संस्कार, टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटीमध्ये पाहिले आहेत. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे तुम्ही आपल्या औकातीत रहा आणि खासदार सुनील तटकरे यांचा नादाला लागू नका' असे म्हणत परांजपे यांनी भरत गोगावले आणि त्यांच्या साथीदारांवर टीका केली.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील वाद पुन्हा भडकला आहे. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरुन वाद सुरु आहे. एका कार्यक्रमात हा वाद पुन्हा भडकल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी टॉवले खांद्यावर घेऊन भरत गोगावलेंना डीवचले होते. त्यानंतर गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदेसेनेने तटकरेवर जबरी टीका केली. याशिवाय वाढदिवसाला आलेल्या मंडळींना टॉवेलवजा नॅपकिप वाटून तटकरे यांना थेट आव्हान दिले.

महेंद्र थोरवे काय म्हणाले?

भरत गोगावले यांच्याविषयी बोलणे आम्ही सहन करणार नाही, आता आम्ही ही लढाई सुरु केली आहे, याचा शेवटही आम्ही निश्चित करणार आहोत. ज्या दिवशी ही ब्याद रायगडमधून बाहेर काढू तेव्हा सर्व रायगडवासीय खुश होती, रायगडला न्याय मिळेल असे आम्हाला वाटते. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

महेंद्र दळवी काय म्हणाले?

काहीही झालं तरी चालेल पण आमचे नेते भरत गोगावले पालकमंत्री होणार, ही आमची शपथ निश्चित आहे आणि ही शपथ पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मग भलेही काही अदलाबदल करायला लागली तरी चालेल पण आम्ही जिद्द सोडणार नाही. दयावे अशी थेट मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT