Prakash Ambedkar- Uddhav Thackeray Alliance saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

Prakash Ambedkar- Uddhav Thackeray Alliance: राज्यात पुन्हा आंबेडकर आणि ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगलीय. त्याविषयी वंचितनं मोठं वक्तव्य केलंय. मात्र या युतीमुळे राजकीय समीकरण कसं बदलणार? आणि युतीपुढील संभाव्य आव्हानं नेमके काय असणार? पाहूयात.

Bharat Mohalkar

  • राज्यात आंबेडकर-ठाकरे युतीची चर्चा रंगली

  • वंचित बहुजन आघाडीने मोठं वक्तव्य केलं

  • संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

  • युतीपुढील आव्हानांमध्ये धोरणात्मक मतभेद आणि जागा वाटपाचा समावेश

राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीसोबतच पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासंदर्भात खुद्द आंबेडकर कुटुंबातूनच ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिलेत. खरंतर महापालिका निवडणूकीत आंबेडकरी मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांसोबत युतीची घोषणा केलीय. तर दुसरीकडे राज ठाकरेंसोबत युती होण्याचं जवळपास निश्चित असलं तरी मराठी मतांसोबतच दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरेही उत्सुक आहेत. मात्र आंबेडकर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंशी युती करण्याची शक्यता अधिक आहे. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात.

आंबेडकरांकडून पवारांचा भाजपचा हस्तक असा उल्लेख, त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी

लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता काँग्रेससोबत युतीची शक्यता कमी

मविआतून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी आंबेडकरांवर टीका करणं टाळलं

प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा हा समान धागा

खरंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 42 लाख मतं मिळवणारा वंचित फॅक्टर चर्चेत आला. तर पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर 23 जानेवारी 2023 मध्ये ठाकरे आणि आंबेडकरांनी युतीची घोषणा केली. मात्र मविआच्या जागा वाटपाच्या तिढ्यामुळे आंबेडकर मविआतून बाहेर पडले. मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आंबेडकरांनी युतीचे संकेत दिलेत. मात्र युतीपुढे कोणती आव्हानं आहेत? पाहूयात.

युतीपुढे जागा वाटपाचं सर्वात मोठं आव्हान

वंचित आणि मविआ कार्यकर्त्यांमध्य़े मनोमिलन अवघड

ठाकरेंचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक संघर्षाची शक्यता

ठाकरे आणि आंबेडकरांचा मुंबई, अकोला, संभाजीनगर, लातूर, सोलापूर आणि नांदेड प्रभाव आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये दलित आणि मराठी मतांची सांगड घातल्यास राज्यात सत्तेचं नवं समीकरण उदयाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर युतीसंदर्भात बोलणी कधी करणार आणि ठाकरे बंधूंपाठोपाठ प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT