Congress MLA Cross Voting Saam TV
महाराष्ट्र

Congress Meeting: विधानपरिषदेतील बंडखोरी भोवणार! काँग्रेस हायकमांड कठोर निर्णयाच्या तयारीत; ७ आमदारांचे ६ वर्षांसाठी निलंबन होणार?

Congress MLA Cross Voting: काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार असल्याने मविआची मुख्य मदार त्यांच्यावर होती. मात्र काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाचा व्हीप डावलून कॉस वोटिंग केले.

Gangappa Pujari

सुनिल काळे, मुंबई| ता. १५ जुलै २०२४

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राष्ट्रीय काँग्रेसची सात मते फुटल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. या बंडखोरीनंतर काँग्रेस हायकमांडने कठोर निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आज दिल्लीमध्ये या संदर्भात बैठक होत असून क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या सात आमदारांना पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार असल्याने मविआची मुख्य मदार त्यांच्यावर होती. मात्र काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाचा व्हीप डावलून कॉस वोटिंग केले. ज्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला.

काँग्रेसमधील या गटबाजीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यानंतर काँग्रेस पक्षानेही या आमदारांविरोधात कठोर कारवाई उचलण्याची तयारी केली आहे. आज दिल्लीमध्ये या संदर्भात महत्वाची बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये बैठक होणार असून 7 काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यावर अंतीम निर्णय होणार असून 7 आमदारांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सूचक विधान केले होते. आम्ही या गद्दार आमदारांविरोधात ट्रॅप लावला होता, त्यांची नावे आता समजली आहेत. असं ते म्हणाले होते. दरम्यान, यामध्ये विदर्भातील 1, मराठवाडातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 तर एक मुंबईतील 1 आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आज दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT