Mahant Sunil Maharaj Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Washim News: '१० महिन्यात १० मिनिटही वेळ दिला नाही', उद्धव ठाकरेंना पत्र; पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा पक्षाला रामराम

Mahant Sunil Maharaj Latest News: वाशिमच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील महाराज यांच्या राजीनाम्याने धक्का दिला आहे.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल

Mahant Sunil Maharaj On Uddhav Thackray: आठ ते दहा महिन्यापासुन भेटीची वेळ मिळत नसेल तर या वरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणुन मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे. असे म्हणत वाशिमच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील महाराज यांच्या राजीनाम्याने धक्का दिला आहे.

महंत सुनील महाराज यांचा राजीनामा

आपण ९ जुलै २०२३ ला पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आले होते. व फेब्रुवारी २०२४ ला जनसंवाद यात्रे निमित्त कारंजा व वाशिम येथे आले होते. ती भेट सोडुन आतापर्यंत आपली दहा मिनीटाची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनिटे भेटीसाठी वेळ दिली जात नाहीत. त्याबद्दल थोड शल्य वाटत आहे.कदाचित आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल हे सुध्दा मला मान्य आहेत, असे म्हणत महंत सुनील महाराज यांनी पत्रातून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.

पत्रात काय म्हणाले?

मी मागील दहा महिन्यापासून मातोश्रीवर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि रवि म्हात्रे यांच्याशी संपर्क करत आहे. भेटीसाठी आपणास सुध्दा काही मॅसेजेस केले होते, तरी सुध्दा दखल घेतली जात नाहीत. माझ्याकडून पक्षात काही नविन कार्यकर्त्याला प्रवेशाची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशासाठी मला निमंत्रण सुध्दा देण्यात आले नाही. साहेब मला पक्षाचे कार्य करायचे आहेत. पक्षाने मला तिकीट दिले पाहिजे हा माझा पूर्ण आणि अंतिम उद्देश किंवा मानस नाही.

"पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात, हे मी समजु शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यापासून भेटीची वेळ मिळत नसेल तर या वरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणुन मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे," असे महंत सुनील महाराज यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT