Eknath Shinde Slams Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: असली कोण, नकली कोण हे दाखवून दिलंय, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde Slams Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परत एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. जनतेने खरी शिवसेना कोणती आणि खोटी शिवसेना कोणती हे दाखवून दिलंय, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विकास काटे , साम प्रतिनिधी

विरोधी पक्षाला जनतेने जागा दाखवली आहे. असली कोण आणि नकली कोण हे दाखवून दिलंय, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरलाय. ते नकली शिवसैनिक आणि नकली हिंदुत्ववादी असल्याची टीका केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंनी आज माध्यमांशी संवाद साधतांना जोरदार उत्तर दिलंय.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरलीय. ते गद्दार आहेत, विधानसभा आणि सर्वोच्च न्यायालयात जरी आम्हाला न्याय मिळाला नसला तरी जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणत होते. विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराजय आला. मात्र यावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना कोपरखळी मारली आहे. जनतेचा दरबारात निवडणुका झाल्या 98 जागा दाखवून 18 जागा निवडून आल्या, असा टोला शिंदेंनी लगावलाय.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती समाजात लोकाभिमुख कार्यक्रम करून उत्सव साजरा केला जातो. पुढचा वर्षी जन्मशताब्दी वर्ष. शिवसेना घडवण्याचे काम केलं. जनता साक्षीदार आहे. सत्तेसाठी राजकारण केलं नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. शासनाचा माध्यमातून लोकाभिमुख कामे केली. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, दुसरे कोणी होऊ शकत नाही. त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

बाळासाहेबांचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं. झालेल्या निवडणुकीत महायुतीला अतिशय दैदिप्यमान विजय मिळवला. इतिहासात युतीला जनतेने कौल दिला. यापुढे जबाबदारी वाढलीय. जनतेने त्यांना योग्य उत्तर दिले आहे. राज्याचा विकास शासनाचा माध्यमातून केला जातोय. कार्यकर्ता घरात शोभत नाही तर जनतेचा दरात शोभून दिसतो. सर्वसामान्यांचे सरकार आहे. शिवसेना शब्द पाळणारी आहे.

सर्व राज्यात शिवसेना वाढत आहे. विरोधी पक्षाला जनतेने जागा दाखवली आहे. असली कोण आणि नकली कोण हे दाखवून दिले आहे. जनतेचा दरबारात निवडणुका झाल्या 98 जागा दाखवून 18 जागा निवडून आल्या आहेत. शिवसैनिकांच्या जीवनामध्ये 23 जानेवारीचा दिवस हा महत्त्वाचा आहे. बाळासाहेब ठाकरे असतांना आनंदोत्सव साजरा केला जात असायचा. वाढदिवस साजरा करून हा दिवस साजरा केला जात असायचा. राज्यभरात विविध उपक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जायचा, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT