Vidhan Parishad Election Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: मोठी बातमी! पंकजा मुंडेंची विधानपरिषेदवर वर्णी, भाजपची 5 नावांची यादी जाहीर

Vidhan Parishad Election: भाजपने आज विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

भाजपकडून या नेत्यांना मिळाली संधी

  • पंकजा मुंडे

  • योगेश टिळेकर

  • परिणय फुके

  • अमित गोरखे

  • सदाभाऊ खोत

विधान परिषदेवर घेत पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. कारण लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. कारण ओबीसी आणि मराठा समाज तेढ निर्माण झाला होता, असं बोललं जात होतं. यामुळेच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती.

यासोबतच लोकसभेत भाजपला शेतकऱ्यांचाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. यातच आता सदाभाऊ खोत यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये योगेश टिळेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. योगेश टिळेकर हे देखील एक ओबीसी चेहरा आहे. भाजप पुण्यातील ते एक मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांनाही संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होतानाच दिसत आहे. याचं कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपचे 5, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2 आणि महाविकास आघाडीकडूनही 2 उमेदवार दिले जातील, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT