MAHARASHTRA POLITICS: OPERATION TIGER BUZZ INTENSIFIES AS THACKERAY MP SKIPS KEY MEETING Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंच्या खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

Maharashtra Politics : धाराशिवमधील एका महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना (UBT) खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या घडामोडीमुळे 'ऑपरेशन टायगर'बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Jadhav

  • धाराशिवमध्ये आयोजित ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर.

  • ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

  • शिंदे गटाच्या संपर्कात ठाकरे गटाचे सात खासदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महायुतीत असलेल्या शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असून ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. वेळोवेळी ठाकरे गटाकडून चर्चांना अफवा असल्याचं म्हटलं जातंय.

परंतु धाराशिवमध्ये होत असलेल्या बैठकीलाच निष्ठावंत खासदाराने दांडी मारल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले आहे. धाराशिवमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पक्षातील सर्वात महत्त्वाचे नेते असलेले रावसाहेब दानवे यांनाही त्याची खबर बात नाहीये.

त्यामुळे निंबाळकरांच्या अनुपस्थितीवर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे सात खासदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली. ओमराजे निंबाळकर बैठकीला गैरहजर का? असा प्रश्न दानवेंनी त्यांना विचारला त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, काही काम असेल म्हणून ते आले नसतील, त्यांच्याच कार्यालयात बैठक होती असं म्हणत दानवेंनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

पालखी सोहळ्यामुळे पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; 10 ते 15 जुलैदरम्यान ‘या’ रस्त्यांवर पूर्ण बंद

SCROLL FOR NEXT