Shruti Vilas Kadam
लिंबू, काकडी, पुदिना आणि पाणी यांसारख्या घटकांपासून तयार होणारे हे हेल्दी ड्रिंक त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
हे डिटॉक्स ड्रिंक शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसू शकते.
पुरेसे पाणी आणि नैसर्गिक घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात, त्यामुळे कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
लिंबू आणि इतर नैसर्गिक घटकांतील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.
नियमित सेवन केल्यास त्वचा अधिक फ्रेश, निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसण्यास मदत मिळू शकते.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडीचे काप, लिंबाच्या चकत्या आणि पुदिन्याची पाने घाला. काही तास तसेच ठेवा आणि नंतर हे पाणी प्या.
हे ड्रिंक त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते, मात्र संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित स्किनकेअर यांची जोडही तितकीच महत्त्वाची आहे.