eknath shinde  Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा

ठाकरेंचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा

हिंगोलीतील ठाकरेंचा खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

भरत मोहळकर, साम टीव्ही

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरेंचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. ६ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ईशान्य मुंबईतील ठाकरेंचे खासदार संजय पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता. आता हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नागेश पाटील आष्टीकर गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज सोमवारी नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल पाऊण तास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

शिंदेंच्या भेटीमागचं कारण काय?

या भेटीवर नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघातील काही कामांची पत्र द्यायची होती. त्यामुळे ही भेट घेतल्याची माहिती नागेश पाटील आष्टीकर यांनी साम टीव्हीला दिली. मात्र ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटी मागे काही राजकीय कारण आहे का याची चर्चा रंगली आहे.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी ठाकरेंचे ८ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात येत होता. यासाठी ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचाही दावाही करण्यात आला होता. परंतु ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता पुन्हा ऑपरेशनची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT