Eknath Shinde On Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

Eknath Shinde On Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे वरातीमागून घोडे, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.

Priya More
  • ठाकरे आणि फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासावरून राजकारण तापले

  • एकनाथ शिंदेंकडून विमान प्रवासावर सडकून टीका

  • शिंदेंनी 'विमानापेक्षा इमान महत्त्वाचे' अशी टीका केली

  • ठाकरे यांच्या सभांनाही शिंदेंनी खोचक शब्दांत लक्ष्य केले

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केला. या विमानप्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली. 'विमानापेक्षा इमान महत्वाचे, कपटी मित्र किती घातक असतो हे देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहिती असेल, असा खोचक टोला शिंदेनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा होत आहेत. या सभावरून देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली. 'उबाठा प्रमुखांच्या सभा म्हणजे वरातीमागून घोडे', असं ते म्हणाले.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडावर गेले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या विमान प्रवासावर प्रतिक्रिया देताना टीका केली. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिला.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, '२०१९ साली शिवसेना आणि भाजप या दोघांनाही एकाच विमानातून प्रवास करण्याचे तिकीट जनतेने दिले होते. मात्र त्यावेळी ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी विमान बदलून काँग्रेससोबतचे विमान धरत जनमताशी बेइमानी केली. त्यामुळेच आज ते गटांगळ्या खात सुटले आहेत. त्यामुळेच आता त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत. त्यांना २०१९ साली कपटी मित्र किती घातक असतो ते पाहिलेले आहे. त्यामुळे मला याबाबत अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.'

उद्धव ठाकरे यांच्या सभांवरून देखील एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की,'उद्धव ठाकरे आज सभा घेत फिरत असले तरीही त्यांना यावेळीही मीच घरातून बाहेर काढले आहे. मराठीत एक म्हण आहे वरातीमागून घोडे अशी त्यांची आज अवस्था आहे. सगळे निघून गेल्यावर हे पोहचत आहेत. त्यामुळे जो बुंद से गयी वो हौदसे नहीं आयेगी एवढा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty: रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटींच्या खंडणीची मागणी अन्..., नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या स्वागताला हिंगोलीत शिवसैनिकांची तुफान गर्दी

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, एअरबॅग्जही उघडल्या, ५ जखमी

SCROLL FOR NEXT