Uddhav Sena alleges a possible split in Shinde Sena as political tensions rise in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

Maharashtra Politics : भाजपचा दबाव वाढल्याने शिंदे सेनेचे ३५ आमदार फुटू शकतात, असा दावा ठाकरे सेनेने केलाय. शिंदे गटात बंडखोरीचा तिसरा टप्पा सुरू झालाय, अशी टीका ठाकरेंनी मूखपत्रातून केली आहे.

Bharat Mohalkar

  • शिंदेंच्या नाराजीचा तिसरा अंक सुरू

  • भाजपनं शिंदेसेनेची कोंडी केल्याचं मुखपत्रात म्हटलंय.

  • शिंदेसेनेचे तब्बल 35 आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत.

शिंदेसेनेचे 35 आमदार फुटणार असा दावाच ठाकरेसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. एवढंच नाही तर शिंदेंच्या नाराजीनाट्याचा तिसरा अंक सुरु झाल्याचा दावाही ठाकरेसेनेनं केलाय. मात्र हा नाराजीनाट्याचा तिसरा अंक कोणता आहे. आणि भाजपनं शिंदेसेनेची कशी कोंडी केलीय.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्टमधून.

ऐकलंत आधी कॅबिनेटवर बहिष्कारास्त्र, दिल्ली दौराही अपयशी ठरलेला. एकूणच शिंदेसेनेची नाराजी काही कमी होताना दिसत नाहीये. शिंदेंनी रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांविषयी केलेली तक्रारच शाहांनी बेदखल केलीय. त्यामुळेच शिंदेंच्या नाराजीनाट्याचा आता तिसरा अंक सुरु झालाय, असं म्हणत ठाकरेसेनेनं शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मात्र ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.

'नाराजी' नाट्य कोसळणार!

जे पेरलं तेच उगवलं, त्यामुळं शिंदे भाजपला नकोसे

शिंदेंना जागा दाखवण्यासाठी 'लोटस' कार्यक्रम सुरू

भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार

रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रारीवर अमित शाहांना हसू आवरलं नाही

जे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फुटण्याची चिंता व्यक्त करावी, हाच विनोद

सत्तापक्षांतील नाराजी नाट्य सुरूच राहील, तिसरा अंक आता सुरू झालाय

हा तिसरा अंक संपवणारी घंटा वाजत आहे

एवढंच नाही तर या नाराजीनाट्याच्या तिसऱ्या अंकासाठी ठाकरेसेनेनं दाखला दिलाय तो हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचा. ही हुतात्मा चौकातील दृश्य पाहा. संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले. मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलंय. त्यावरुन ठाकरेसेनेनं शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय. तर भाजपनंही ठाकरेसेनेला प्रत्युत्तर दिलंय. हे नाराजीनाट्य फक्त एका कार्यक्रमापुरतं मर्यादित राहिल नाहीये. शिंदेंच्या नाराजीची मालिका सुरुच आहे. पाहूयात

भाजपच्या ऑपरेशन लोटसविरोधात कॅबिनेटवर बहिष्कार

फडणवीसांनी सुनावल्यानंतर दिल्लीत शाहांची भेट

शाहांकडे फडणवीस, चव्हाणांची तक्रार, मात्र शाहांकडून भाजपाचीच पाठराखण

नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर फडणवीस, अजित पवार एकत्र, शिंदे मात्र एकटेच निघाले.

खरंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. त्याच प्रकारे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन शिंदेसेनेचीही शकलं उडणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Leopard Attack : अहिल्यानगर हादरलं! बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

महायुतीत फोडाफोडी सुरूच! एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना धक्का, बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Zodiac Signs: चंद्र कन्या राशीत; काम, पैसा आणि नात्यांसाठी आजचा दिवस किती शुभ?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक भाकीत

SCROLL FOR NEXT