Laxman Hake Demand Cabinet Ministerial Post Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake: नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

Laxman Hake Demand Cabinet Ministerial Post: महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी त्यांनी महायुतीकडे केली आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ केला. तब्बल २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्रि‍पदाची शर्यतही अटातटीची झाली आहे.

महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वातही खल सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. 'नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवं.', अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'जरांगेंना लोक कंटाळले आहेत. १३० जागा पाडायची भाषा केली होती त्यांनी. जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहे. पण मी जिथं सभा घेतल्या तिकडच्या उमेदवारांना चांगली मतं पडली आहेत.'

लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं. लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो.'

गृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवं - हाके

लक्ष्मण हाके म्हणाले की, 'मला विधानपरिषदच काय, कॅबिनेट मंत्रिपद हवंय. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रात काय तर द्यायला हवं. अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व मी करतोय.' दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेली मागणी आता महायुती पूर्ण करते की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: धोनीचा खास भिडू पलटणकडून खेळणार! मुंबईने लावली मोठी बोली

Assembly Election 2024: राज्यातील बडे नेते झाले काठावर पास; कोण विजयी अन् कोण पराभूत

Maharashtra News Live Updates: महायुतीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्नला नकार?

IPL Mega Auction: IPL लिलावात अन्कॅप्ड खेळाडूंचा बोलबाला! या स्टार खेळाडूंवर लागली कोटींची बोली

Uddhav Thackeray : ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत, पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा वज्रमूठ आवळली!

SCROLL FOR NEXT