nilesh rane, uddhav thackeray, eknath shinde, maharashtra political news
nilesh rane, uddhav thackeray, eknath shinde, maharashtra political news saam tv
महाराष्ट्र

Shivsena : 'कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक राहणार नाहीत असं दिसतंय'

Siddharth Latkar

सातारा : शिवसेना (Shivsena) नेते राज्याचे (maharashtra) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आज त्यांच्यासमवेत केवळ आमदारच नव्हे तर काही खासदार देखील आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane), आमदार नितेश राणे (nitesh rane) आणि माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. गेल्या दाेन दिवसांत निलेश राणे यांनी पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही असे म्हणत मातोश्री ११ आयपील टीम बनवा, असे म्हटले हाेते. आजही निलेश राणेंनी यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कालच्या ज्यांना जायचे आहे त्यांना जा या वक्तव्यावर टिप्पणी केली आहे. (nilesh rane latest marathi news)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) यांच्यासमवेत 80 टक्के आमदार असल्याचे बाेलले जात आहे. शिंदे यांच्या बंडामुळी राज्य सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री वर्षा हा शासकीय बंगला साेडून माताेश्री या त्यांच्या मूळ निवासस्थानी गेले. त्यापुर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

दरम्यान शिवसेनेने काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेनेच्या सर्व आमदारांना बैठकीस बाेलावले हाेते. या बैठकीस जे येणार नाहीत. त्यांच्यावर कठाेर कारवाई केली जाईल असे आमदारांना बजावलेल्या नाेटीसीत म्हटले हाेते. ताे धागा पकडत माजी खासदार निलेश राणे यांनी आज एक ट्विट केले आहे. ते लिहितात काल मुख्यमंत्री म्हणाले ज्यांना जायचे त्यांनी जा, पटकन अजून सहा आमदार निघून गेले.

कॅरम खेळण्या पुरते पण शिल्लक राहणार नाहीत असं दिसतंय.

दरम्यान बुधवारी माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केले हाेते. त्यात पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही असे म्हटलं हाेते. शिवसेनेचे ११/१२ आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन IPL team साठी तयारी करा. मातोश्री ११ बनवा." असे म्हटले हाेते.

शिवसेनेचे बहुतांश आमदारांनी बंडाळी केल्याने माजी खासदार निलेर राणेंनी ट्विट करुन शिवसेनेची नेहमीची घोषणा "बोल ही मुंबई कोणाची" म्हणत म्हणत "बोल ही शिवसेना कोणाची" विचारायची परिस्थिती आली आहे असेही म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT