Rohit Pawar has made a significant statement regarding the ED raid on Kannad Sugar Factory. Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar News: मला जेलमध्ये टाकू शकतात, रोहित पवारांना भीती; शरद पवारांनाही चिंता

Maharashtra Politics News: माझा आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकू शकतात, अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज व्यक्त केली.

भारत नागणे

Rohit Pawar News:

ईडीने कन्नड येथील साखर कारखाना बंद ठेवण्याची नोटीस दिली आहे. यापुढची पायरी म्हणून आता माझा आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकू शकतात, अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज व्यक्त केली. रोहित पवार आज सांगोला तालुक्यातील शेकापच्या मेळाव्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Loksabha Election )

काय म्हणाले रोहित पवार?

"माझ्यावर आणि माझ्या साखर कारखान्यावर जी कारवाई झाली आहे. ती व्हायला नको होती. तरीपण चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. ज्यावेळी हा कारखाना विकत घेतला‌ तेव्हा कारखान्यावर प्रशासक होता. दोन आयएएस अधिकाऱ्यांसमोर कागदोपत्री पारदर्शकपणे व्यवहार झाला आहे. तरीपण इतरांना सोडता आणि मला धरता," असे रोहित पवार म्हणाले.

तसेच "आता जी शेवटची कारवाई सुरू आहे. कारखाना बंद ठेवण्याची नोटीस आली आहे. जी शेवटची स्टेप असते ती म्हणजे जेलमध्ये जाण्याची ,आम्ही लोकांचा मुद्दा मांडतो. तो त्या लोकांना पटत नाही. म्हणून मला जेलमध्ये टाकण्याची भिती आहे. तरीपण त्यांना‌ घाबरणार नाही. मला थांबवण्यासाठी कदाचित ही कारवाई केली असावी तरीपण लोकांमध्ये मी जाऊन प्रचार करणार असल्याचे," ही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


शरद पवारांनीही व्यक्त केली चिंता..

दरम्यान, आज पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनीही याच मुद्द्यावरुन भाष्य केले होते. "ईडीच्या कारवाया फक्त विरोधकांवर होतात असा आरोप करत अनिल देशमुख, संजय राऊत यांचे उदाहरण पाहिले. रोहीत पवार यांच्या बाबतीतही तेच सुरु आहे. रोहित पवार यांना आत्ता दोन- दिवसात बोलावले गेले. त्यांच्या संस्थेची जप्ती करणं, कारवाई करणे सुरू आहे, त्यामुळे काय होईल काही भरोसा नाही," असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT