Praful Patel Statement On Ajit Pawar And Sharad Pawar 
महाराष्ट्र

NCP Vs NCP: पवारसाहेब अन् अजितदादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेलांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

Praful Patel Statement On Ajit Pawar And Sharad Pawar: अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावरून मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनलाय. याच दरम्यान काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावरून मोठं विधान केलंय. पटेल यांच्या विधानामुळे राज्यातील रादकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले आणि त्यातून पवार साहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, त्यात गैर नाही असं विधान प्रफुल पटेल यांनी केलंय. पटेल यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट फडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन शकले तयार झाली आहेत.

अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. भाजपसोबत अजित पवारांनी साठगाठ बांधल्याने शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हल्लाबोल केला होता. दोन्ही काका-पुतण्यामध्ये राजकीय वैर आलं होतं. एकमेकांच्या कार्यक्रमात जाणेही ते टाळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची जवळीक वाढलीय. अनेक कार्यक्रमात ते एकत्र दिसलेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

जय पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने अजित पवार यांनी काका शरद पवार यांचे आदरातिथ्य केले होतं. आता रयत शिक्षण संस्थेच्या एका बैठकीत पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र आलेत. त्यात खासदार प्रफुल पटेल दोघांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब आणि अजित पवार एकत्र आले आणि त्यातून पवार साहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर दोघांच्या एकत्रित येण्यावर आपल्याला काही गैर वाटत नाही असं प्रफुल पटेल म्हणालेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT