Ajit Pawar and Sharad Pawar factions of NCP unite in Kolhapur under Hasan Mushrif’s leadership to form the ‘Rajarshee Shahu Alliance’. Saam Tv
महाराष्ट्र

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Political Earthquake in Maharashtra: ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येत एकीची वज्रमूठ आवळलीय... मात्र हे नेमकं कुठं घडलंय? आणि सुप्रीम कोर्टातील निकालाआधीच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का?

Omkar Sonawane

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात रणशिंग फुंकलं.. मात्र आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालंय..कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड नगरपरिषदेत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणाच मंत्री हसन मुश्रीफांनी केलीय..

खरंतर विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली.. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.. दुसरीकडे याआधीच अजित पवारांनी शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं वक्तव्य केलं होतं....

खरंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाला कारण ठरलंय ते चंदगड नगरपरिषद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचं.... हसन मुश्रीफांनी राजेश पाटील आणि कुपेकर यांच्या गटाला एकत्र आणत युतीची घोषणा केलीय.. त्यासाठी त्यांनी राजर्षी शाहू आघाडीची स्थापना केलीय.. मात्र हे दोन्ही राष्ट्रवादीचं लोण फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर बीडमध्येही पसरलंय.. बीडच्या आष्टी तालुक्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र म्हस्केंनी दिलेत.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पवारांचं झालेलं मनोमिलन आता भाजपविरोधात राजकीय पातळीवरही कायम राहणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT