ओंकार कदम, प्रतिनिधी...
Ajit Pawar On Devendra Fadanvis: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावरून राजकीय चर्चा रंगलेल्या असतानाच दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकमध्ये जाऊन प्रचार करणारी नेतेमंडळी महाराष्ट्रातील विरोधकांवरही टीका करताना दिसत आहेत.
रविवारी सीमाभागातील निपाणीत प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा केला होता. त्यावरून आता अजित पवारांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. तर अजित पवार यांनीदेखील त्यांच्या शैलीत देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला.
या टीकेवर आज अजित पवारांनी आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत खोचक भाषेत प्रत्युत्तर दिलं. “ठीक आहे. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीसांना चोख उत्तर दिले आहे. (Latest Marathi News)
तसेच "जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपाची वक्तव्यं असतात”, असेही अजित पवार म्हणाले. (Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.