Sharad Pawar Ajit Pawar Meeting saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: भव्य रॅली, जोरदार शक्तीप्रदर्शन... अजित पवारांची तोफ आज बीडमध्ये धडाडणार; सभेची जय्यत तयारी!

Ajit Pawar Meeting In Beed: शरद पवार यांच्या सभेनंतर आज (२७, ऑगस्ट) अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होत आहे.

विनोद जिरे

Ajit Pawar Rally In Beed: शरद पवार यांच्या सभेनंतर आज (२७, ऑगस्ट) अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. अजित पवार गटाची राज्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. धनंजय मुंडेंच्या नियोजनामध्ये या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आजच्या सभेत अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)

अजित पवारांचे बीडमध्ये शक्तीप्रदर्शन...

बीडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आज मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे सर्व सदस्य उपस्थितीत राहणार आहेत.

सभेची जय्यत तयारी....

अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.आज सकाळी 11 वाजल्यापासून बीडमध्ये (Beed) अजित पवार गटातील मंत्री दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. स्वतः अजित पवार हे दुपारी दीड नंतर हेलिकॉप्टरने दाखल होतील.

भव्य रॅली आणि सभा....

दुपारी 3 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार असून ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळी ५ वाजता ही सभा होईल.

शरद पवारांना उत्तर देणार?

सभेतून 17 ऑगस्टला झालेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभेला उत्तर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अगोदरपासून उत्तर देण्याची ही सभा नसून बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि दुष्काळ मुक्तीची सभा असणार आहे. असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT