Maharashtra Politics Live Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update: राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष आजच ठरणार, सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर?

शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे.

Shivani Tichkule

सुप्रिया सुळेंशी माझे बोलणे झालेय - जयंत पाटील

सुप्रिया सुळे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आज कोणताही बैठक झाली नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे, तिथे मी उपस्थित राहणार आहे. पवार साहेबांमुळे पक्ष वाढला आहे, त्यांनी निर्णय बदलावा अशी मागणी आम्ही करत आहोत. मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीबाबत बोलताना तोल का जातो? ते एक जबाबदार मंत्री आहेत, असेही जयंत पाटील यांनी सुनावले.

शरद पवार यांच्या निवृत्तीचं कारण अजूनही स्पष्ट नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी ठिय्या मांडून बसले आहेत

जोपर्यंत पवार साहेब निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट

आज कोणतीही बैठक बोलावली नव्हती - छगन भूजबळ

आज राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक बोलवली नाही. मुंबई बाहेरील नेते आल्यावर बैठक घेऊ अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्व्हर ओक वर बैठक

सिल्वर ओकवर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत आजची ही होणार बैठक होणार आहे. अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीला त्यांची गरज आहे - माजी आमदार वीरेंद्र जगताप

२ मे रोजी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर शरद पवार यांनी निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुरोगामी विचारायचे आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणारे आहेत. महाविकास आघाडीला त्यांची गरज आहे. त्यामुळे शरद पवारांनी अध्यक्षपदावरच राहावं ही इच्छा सर्वांचीच आहे.

आजच्या बैठकीत मला निमंत्रण नव्हतं – जयंत पाटील

मुंबईतील व्हा. बी. सेंटरला राष्ट्रावादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीबाबत जयंत पाटील यांनी आपल्या निमंत्रण नव्हतं अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे.

सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्या तर आम्हाला नक्की आवडेल - यशोमती ठाकूर

प्रिया सुळे यांना मोठ झालेल बघणं हे सगळ्यांच आवडेल आणि आम्हाला तर नक्कीच आवडेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. आम्ही जेव्हा सुप्रिया सुळे यांच्याकडे बघतो, आमचे विचार जुळतात, त्या जर पक्षाच्या अध्यक्ष झाल्या तर शेवटी त्या शरद पवार साहेबांची लेक आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये त्या लहान्याच्या मोठ्या झाल्या आहे. त्यामुळे एक महाराष्ट्राची लेक मोठी होत असताना सर्वांनाच आवडेल अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनि दिली.

जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

वाय.बी. सेंटरमध्ये राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

वाय बी सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा होणार असल्याचे संकेत येत आहेत. समितीतील अनेक नेते आज बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT