तीन महिन्यात राज्यातील महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते गिरीश महाजन ठाकरे गटाला चिमटा काढलाय. येत्या ८ दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार आहे, या भूकंपाच्या धक्क्यात ठाकरे गट जमीनदोस्त होणार असल्याचं भाकित गिरीश महाजन यांनी केलंय. (Thackeray Group Leader Will Join BJP Says Girish Mahajan)
महापालिका निवडणुका तोंडाशी आल्या आहेत, अशात राजकीय पक्ष डावपेच आखू लागलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मात्र अगळीक घडलं. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे फडणवीस यांच्या भेटीला आले. बडगुजर हे लवकर ठाकरे गटाला रामराम करणार असल्याच संकेत गिरीश महाजन यांनी दिलेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.
महापालिका निवडणुकीआधी शिंदे गट आणि भाजप ठाकरे गटाची ताकद कमी करू पाहत आहे. मुंबई महानगरपालिकेतील जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यानंतर या निवडणुका तोंडावर आल्या असताना नाशिकमध्ये भाजप ठाकरे गटाला धक्के देण्याच्या तयारीत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोण राहतो आणि कोण कोण पक्ष सोडतो, हे पुढच्या आठ दिवसांत समजेल, असे भाजप नेते गिरीश महाजन म्हणालेत. त्यामुळे बडगुजर यांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू झालीय. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान बडगुजर यांनी फडणवीस यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया देत सर्व राजकीय चर्चांना फेटाळून लावल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने म्युनिसिपल सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं बडगुजर म्हणालेत. क्लास वन, क्लास टू मधील रिक्त पदे भरणे गरजेचे असल्याचं बडगुजर म्हणालेत. आपण रविवारीच मी फडणवीस यांची वेळ मागितली होती, असेही बडगुजर म्हणालेत. आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याची कल्पना संजय राऊतांना होती असंही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.