Mallikarjun Reddy On BJP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

'भाजपमध्ये आम्ही गडकरी समर्थक असल्यामुळे आमच्यावर कारवाई होत आहे.', अशा पद्धतीचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार मालिकार्जुन रेड्डी यांनी केला. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधतना आपली भूमिका मांडली. तसंच, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले की, 'निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये कारवाई होत असेल तर हे योग्य नाही. गडकरीसाहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मागे टाकण्याचं काम सुरू आहे. माजी आमदार गिरीश व्यास आता दिसत नाही. अनिल सोले विधान परिषदेमध्ये होते ते आता दिसत नाही. आता माझा नंबर लागला उद्या कोणाचाही नंबर लागेल. महाराष्ट्रात हे काय सुरू आहे?', असा सवाल मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उपस्थित केला आहे.

तसंच, 'गडकरीसाहेबांनी तळागळातील कार्यकर्त्यांना घेऊन पार्टी उभी केली. जोपर्यंत ते नेते आहे राजकारणात आम्ही सेवा करत राहू. स्वार्थासाठी आम्ही राजकारणात आलो नाही. जी कारवाई माझ्यावर झाली ती योग्य आहे का? कुठल्या कार्यकर्त्याला विचारलं तर तो त्याचे उत्तर देईल. बोलण्यात जे चूक झाली त्यावर विचार करावा. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहील.', असे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले.

त्याचसोबत, 'तो मतदारसंघ भाजपकडे राहो यासाठी मी त्या दिवशी माध्यमांशी बोललो. पण मला कुठली नोटीस न देता माझ्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता पुढील भूमिका मी २८ तारखेला घेईल. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधल्यानंतर मी निर्णय घेईल. पक्षाचा कार्यकर्ता आहे मी म्हणून काम करत राहिल.' असेही माजी अमादर मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT