Ashok Chavan Big Statement Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मला संपवण्याचा प्रयत्न केला..., भाजप खासदाराचं खळबळजनक विधान

Ashok Chavan Big Statement: भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केले आहे. 'माझा १४ वर्षांचा वनवास संपला. मी काँग्रेसमध्ये असताना माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले.', असं विधान अशोक चव्हाण यांनी केले.

Priya More

Summary -

  • अशोक चव्हाण यांनी ‘माझा १४ वर्षांचा वनवास संपला’ असे विधान केले.

  • काँग्रेसमध्ये असताना माझ्यावर मोठे आरोप झाले होते, असे ते म्हणाले.

  • २०१० मध्ये माझ्यावर मोठे आरोप करत पायउतार करण्यात आले, असे ते म्हणाले.

  • त्यामुळे पीएम मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

'माझा १४ वर्षांचा वनवास संपला.', असं मोठं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केले. लातूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी यावेळी काँग्रेस सोडण्यामागचं कारण देखील सांगितले. काँग्रेसमध्ये असताना काय त्रास झाला हे देखील त्यांनी बोलून दाखवले.

खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले की, 'माझा १४ वर्षांचा वनवास संपला. राजकारणातल्या यशोशिखरावर असताना २०१० मध्ये माझ्यावर मोठे आरोप करत पायउतार करण्यात आले. माझ्यावर निष्कारण मोठे आरोप करण्यात आले होते म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो आहे.' अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

अशोक चव्हांनी पुढे असेही सांगितले की, 'मी आयुष्यातले १४ वर्षे वनवासात होतो. मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे मी निर्णय घेतला. पीएम मोदी आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून भाजपमध्ये आलो. मागच्या काळात जेवढे प्रयत्न काँग्रेससाठी केले तेवढेच प्रयत्न आम्ही भाजपसाठी करू'

तसंच, 'नांदेडमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे झालेले आहेत. शासनाच्या निकषानुसार निधी देण्यात आला आहे. व्याप्ती मोठी आहे. सर्वांना मदत देण्यासाठी सरकार निर्णय घेईल. नांदेडला देखील आम्ही अनेक सहकाऱ्यांनी एकत्र येऊन नऊच्या नऊ जागा जिंकल्या.', असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Dhule Crime News : धुळ्यात रक्तरंजित थरार! महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या, परिसरात खळबळ

Ration Card Online: घरबसल्या बनवा रेशन कार्ड! मोबाईल अ‍ॅपवरच होईल पूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Akshay Nagalkar Killing Case: शेतात जाळलं, हत्यारासह हाडं ठेवली लपवून; महाराष्ट्राला हादरवणारं 'MH 30' हॉटेल हत्याकांड

Shahrukh Khan: 'मन्नतमधील रुम भाड्याने मिळेल का?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं मिश्कील उत्तर

SCROLL FOR NEXT